पिंपरी (Pclive7.com):- तीन अल्पवयीन मुलांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड करत रिल्स बनवल्याची घटना समोर आली आहे. कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. ही घटना मध्यरात्री थेरगाव परिसरात घडली.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अज्ञात तीन अल्पवयीन मुलांनी थेरगाव येथे कोयत्याने वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दोन अल्पवयीन मुलांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्या अल्पवयीन मुलाचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, कोयत्याने वाहनांच्या काचा फोडत असताना दुसरा मुलगा रिल्स काढत होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडचे सत्र थांबलेले होते. आता पुन्हा वाहन तोडफोडीने डोकं वर काढले आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस घेत आहेत.























Join Our Whatsapp Group