वडगाव मावळ (Pclive7.com):- अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका व श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.२३ जून रोजी श्री पोटोबा महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरला पायी जाणाऱ्या मावळ तालुक्यातील दिंडीचा ताडपत्री देऊन व दिंडीतील प्रमुख अध्यक्ष, तुळशी वृंदावनधारक महिला भगिनींचा सन्मान, मावळ भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्रआप्पा भेगडे यांचे विशेष सहकार्यातुन अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले व मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी हभप मंगल महाराज जगताप, संतोष महाराज काळोखे, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे, मावळ तालुका अध्यक्ष शांताराम बोडके, दत्तात्रय लायगुडे, उद्योजक शंकरराव शेळके, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, उप सभापती गणेश गायकवाड, शांताराम कदम, प्रविण चव्हाण, मावळ तालुका खरेदी विक्री संघांचे व्हा. चेअरमन पंढरीनाथ ढोरे, वडगाव सोसायटीचे चेअरमन निलेश म्हाळसकर, चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, पंढरीनाथ भिलारे, प्रकाश कुडे, भाऊसाहेब ढोरे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायणराव ठाकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, सरपंच नितीन कुडे, भरतशेठ म्हाळसकर, धनंजय नवघणे आदिसह तालुक्यातील वारकरी मंडळ व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी हभप प्रकाश महाराज बोधले व खासदार श्रींरंग बारणे यांनी मनोगत व्यक्त केले, संतांच्या अनुकरण करून काम करत राहिल्यास समाज त्यांच्या मागे उभा राहत असतो, याचा आदर्श म्हणून 14 वर्षे सातत्याने श्री पोटोबा देवस्थान व अखिल भारतीय वारकरी मंडळ हे कार्य करत आहे. अण्णांची आठवण काढत असताना कामाचा पाठपुरावा कसा असावा हे मा मुख्य विश्वस्त सोपानराव अण्णा म्हाळसकर यांचेकडून शिकणे सारखं होते, म्हणून पुढील काळात देखील या कार्याला सर्वोतपरी मदत करेल असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.
कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष शांताराम बोडके, संतोष कुंभार यांनी केले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पगडे, शांताराम म्हाळसकर व नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी महाप्रसादाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, सूत्रसंचालन हभप गणेश महाराज जांभळे व आभार नारायणराव ढोरे यांनी मानले.























Join Our Whatsapp Group