पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कारर्कीदीला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार बारणे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशन प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मनोहर भोईर उपस्थित होते. गेल्या चार वर्षा मध्ये त्यांनी लोकसभेमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातील व केंद्राशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. खासदार बारणे लोकसभेचे सदस्य झाल्यापासून संसदेमध्ये आत्तापर्यंत ९३५ तारांकित व अतारांकित प्रश्न मांडले, तसेच २५५ वेळा प्रत्यक्ष चर्चेत त्यांनी सहभाग घेतला, तर १६ महत्वाच्या विषयांवर खाजगी विधेयके मांडली असून त्यांची लोकसभेतील एकूण उपस्थिती ९५ टक्के राहिली असून १०० टक्के स्थानिक खासदार निधी खर्च केला आहे.
या अहवालामध्ये त्यांनी केलेली विकास कामे, संसदेमध्ये मांडलेले प्रश्न, त्यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा, स्थानिक खासदार निधीतून केलेल्या कामाचा तपशील, पंतप्रधान साह्यता निधीतून केलेली मदत याची सविस्तर माहिती सादर केली आहे.
























Join Our Whatsapp Group