पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आपुलकीचा संवाद साधत शहरातील राजकीय, सामाजिक तसेच विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, त्यांच्या या भेटीवेळी दादांनी भक्तिभावाने बाप्पांची आरती करून आशीर्वाद घेतले.

याच प्रसंगी नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटन बळकट करणे, जनसंपर्क वाढवणे आणि भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व दादांनी अधोरेखित केले.नवनिर्वाचित सदस्यांना त्यांनी आगामी काळात संघटनेची जबाबदारी अधिक जोमाने पार पाडण्याचे आवाहन केले.

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करून शहरातील विविध उपक्रमांची माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांनी शत्रुघ्न काटे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी माजी खासदार अमर साबळे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे,माजी महापौर माई ढोरे, उमेश चांदगुडे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, वैशाली खाडये, मधुकर बच्चे, राज्यपरिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काळुराम बारणे, उपाध्यक्ष विनायक गायकवाड, राम वाकडकर, अमित पसरणिकर, विनोद मालू, प्रदेश दक्षिण भारतीय आघाडी माजी अध्यक्ष राजेश पिल्ले, प्रवक्ता कुणाल लांडगे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजू दुर्गे, नारायण आबा काटे, जयनाथ काटे, सदस्य धनंजय ढोरे, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, मोहन राऊत, हर्षदभाऊ नढे, मंडल अध्यक्षा अनिता वाळुंजकर, गणेश वाळुंजकर, संत तुकारामनगर- खराळवाडी- कासारवाडी मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे, सचिव खंडूशेठ कठारे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजित बोरसे, कोषाध्यक्ष राजाभाऊ मासूळकर, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष बापूसाहेब घोलप, OBC मोर्चा अध्यक्ष चेतन भुजबळ, सहकार आघाडी सुनीलशेठ कुंजीर, दिव्यांग सेल अंकुश शिर्के, सांस्कृतिक सेल अध्यक्ष विजय भिसे, OBC मोर्चा प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, केशव घोळवे, अजित कुलथे, कैलास सानप, सीए सेल अध्यक्ष बबन डांगले, वैद्यकीय प्रकोष्ट डॉ. अमित नेमाने, युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राज तापकीर, आयुष्यमान भारत सेल अध्यक्ष गोपाळ माळेकर, नानिक पंजाबी, गणेश ढाकणे, प्रदीप बेंद्रे, राजाभाऊ चिंचवडे, प्रसिद्ध गाडामालक भानुदास काटे पाटील, पोपट काटे, उद्योजक वसंत काटे, सोमनाथ काटे उद्योजक, राहुल काटे, रमेश काटे, संजय भिसे, कुंदा भिसे, प्रकाश झिंजुर्डे, बाळासाहेब काटे, अर्जुन काटे, भरत काटे, चंद्रकांत काटे, संदीप काटे, आबा पांढरे, अरुण चाबुकस्वार, सुदाम कापसे, सुभाष भिसे, कैलास कुंजीर, प्रवीण कुंजीर, प्रमोद नढे, अमोल नखाते, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group