पिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी क्लीन सिटी म्हणून बहुमान मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आता स्वच्छ भारत अभियानाचा बोजबारा उडाला आहे. केवळ सर्वेक्षणात गुण प्राप्त व्हावेत, याकरिता कागदोपत्री स्वच्छ भारत अभियान राबविणारे अधिका-यांच्या उदासीन धोरणाने स्वच्छ शहरात अस्वच्छता दिसू लागली आहे. यामूळेच महापालिका हद्दीतील नवी सांगवी परिसरात कचराकुंडी ओसडूंन वाहू लागल्या आहेत. याबाबत स्थानिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारीकडे दुर्लक्ष करुन कचरा उचलला जात नसल्याचे नागरिकांने आरोग्य धोक्यात आले आहे.
स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छता सर्वेक्षण मोहीमेत पिंपरी चिंचवड महापालिकेने ७२ व्या स्थानावरुन ४३ व्या स्थानी आले आहे. परंतू, स्वच्छतेच्या बाबतीत शहरातील वस्तूस्थिती वेगळी आहे. या अभियानात नागरिकांमध्ये जनजागृती करणे, नागरिकांना घराबरोबर परिसरातही स्वच्छता ठेवण्यास भाग पाडणे, स्वच्छता अॅपद्वारे जागृती करण्याचे प्रबोधन करणे आदी घटकांना मार्क देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात टॉप-१० मध्ये आलेल्या शहरांचा गौरव करण्यात येतो. २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहराचा ९ वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून १ ला नंबर आला होता. पंरतु, २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड शहर ७२ व्या स्थानावर गेले होते. यंदा स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत ४३ व्या स्थानावर आले आहे.
दरम्यान, नवी सांगवीसह परिसरात कचरा कुंड्या ओसडून वाहत आहेत. मयूर नगरीसमोरील कचराकुंडी गेली आठ दिवस झाले भरुन वाहत आहे. दोनदा कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाला कळविण्यात आले. परंतू, काहीच फरक पडलेल्या नाही. अनेक उपनगरातून घंटागाड्या देथील तेथेच कचरा आणून टाकतात .याशिवाय भाजी विक्रेते, हॉटेल चालक, सोसायट्यांचा कच-यामुळे त्या कचराकुंडी ओव्हरफुल होत आहेत. या ठिकाणी भटकी कुत्रे, मोकाट जनावरांचा उच्छांद मांडला आहे.
सकाळी मॅार्निग वॅाकला जाणा-या नागरिकांना कुत्र्यासह घाणीच्या साम्राज्याचा त्रास होवू लागला आहे. सध्या पावसामुळे कचरातून दुर्गंधी येत आहे. दिवसापासून दोनदा कचरा उचलण्याची मागणी व भटके कुत्र्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आयुक्तांकडे केली आहे.





















Join Our Whatsapp Group