पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांना पाणी तसा नवीन नाही. परंतू ऐन पावसाळ्यात शहरवासियांना पाणी प्रश्नांला सामोरे जावे लागत आहे. आज काळभोरनगर परिसरातील या प्रश्नावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
प्रभाग क्रमांक १४ मधील काळभोर नगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात देखील प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईच्या विरुध्द नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यातील समोर समोर चर्चासत्राचा रंगलेला सामना काळभोरनगर वासीयांना अनुभवयास मिळाला.
पाणी प्रश्न? या विषयावर नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील चर्चासत्र असा कार्यक्रम आज मंगळवार दिनांक ३ जुलै रोजी काळभोर नगर येथे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्या संयोजनातुन घेण्यात आला. या कार्यक्रमास अ प्रभाग समितीच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेक प्रमोद कुटे, वैशाली काळभोर तसेच मनपा स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १४ मधील काळभोरनगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात देखील प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईच्या विरुध्द नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यातील समोर समोर चर्चासत्राचा रंगलेला सामना काळभोरनगर वासीयांना अनुभवयास मिळाला. कार्यक्रमात भाई भोसले, श्री. विचारे, सौ.सतीश बाराहाते, सौ.मस्करणीस, सौ.आमीन, श्री.नंदू भोगले, सौ.भोसले ताई यांनी उपस्थित नगरसेवकांना पाणी प्रश्नाबाबत अक्षरशः फैलावर घेतले.
यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना नगरसेवकांची पुरती दमछाक झालेली दिसुन येत होती. प्रचंड पाणी टंचाईने या भागातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत, त्यामुळे त्यांचा रोष त्यांच्या बोलण्यातुन दिसुन येत होता. प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत होणेकामी थेट लोकप्रतिनिधींना समोरासमोर जाब विचारण्याच्या मिळालेल्या संधीचा नागरिकांनी पुरेपुर उपयोग करुन घेतला आणि १५ जुलैच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे नगरसेवकांकडून अक्षरशः वधवुन घेतले. या कार्यक्रमास पाणी पुरवठा अधिकारी देखील उपस्थित राहणार होते, परंतु आयुक्तांचा पालखी नियोजन उद्याचा दौरा अचानक आजच घेतल्यामुळे ते उपस्थित राहु शकले नाहीत. परंतु अ प्रभाग अध्यक्षा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी १५ जुलै पर्यंत संपुर्ण पाणी पुरवठा सुरळीत करुन देण्याचे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले तेव्हा कुठे नागरिकांचा रोष कमी झाल्याचे दिसले. सदर कार्यक्रमास काळभोर नगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांची उपस्थिती भरपुर होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले तर आभार आमीनभाई यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group