पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ तळवडे–रुपीनगर येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भीम क्रांती सामाजिक संस्था यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री. पंकज दत्तात्रय भालेकर, श्री. शरद वसंत भालेकर, सौ. सीमा धनंजय भालेकर व सौ. चारुलता रितेश सोनवणे या चारही उमेदवारांना संस्थेने अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे. भीम क्रांती सामाजिक संस्था ही छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेवर आधारित असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा असल्याने हा पाठिंबा देण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या चारही उमेदवारांनी आतापर्यंत प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम केले असून, जनतेच्या समस्या सोडवण्याची त्यांची क्षमता व विकासाभिमुख दृष्टिकोनावर संस्थेचा पूर्ण विश्वास आहे. हे उमेदवार निवडून आल्यास प्रभागासह पिंपरी–चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी मा. भवानीसिंग चंडालिया यांनी सर्व मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच भीम क्रांती सामाजिक संस्थेचे पदाधिकारी देवा एकुळे, गोपाळ ठरके, संतोष आव्हाड, प्रवीण पायाळ, विजय उघडे, प्रदीप खांडेकर, बाळू माने, बाबासाहेब रोकडे, विक्रम साळवे, कुमार गावंडे, अजय ढगे, वनमाला गावंडे, वंदना अहिरे, सोजर पायाळ, सुनंदा एकुंबे, वर्षा पडांगळे, शीतल घोडके, सुरेखा एकुंबे, पवार ताई, सोनवणे ताई, नंदा गावंडे तसेच मार्गदर्शक अरुण दादा थोपटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून, आगामी निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
























Join Our Whatsapp Group