पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देण्याचे धोरण पक्षाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय पटनी यांची भाजप पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून, “निष्ठावंत कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

पिंपरी चिंचवड भाजपच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयामध्ये शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी संजय पटनी यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी पक्षाचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
संघटनेला मिळणार नवी उभारी..
संजय पटनी यांच्यासोबतच पक्षाने इतरही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये क्रीडा प्रकोष्ट शहराध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे, दिघी-गवळीनगर-गव्हाणेवस्ती मंडलाध्यक्ष प्रमोद परदेशी, चिखली-कृष्णानगर मंडलाध्यक्ष अजय साने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे शहरात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याच्या संकल्पनेतून आम्ही सर्वजण काम करत आहोत. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे या कामाला अधिक गती मिळेल. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. संजय पटनी यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन पक्षाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ‘शेवटच्या घटकाचा विकास’ ही संकल्पना तळागाळापर्यंत नेण्यासाठी हे सर्व नवनियुक्त पदाधिकारी खंबीरपणे काम करतील, असा मला विश्वास आहे.”– महेश लांडगेआमदार, पिंपरी चिंचवड शहर.
Tags: Sanjay Patni





















Join Our Whatsapp Group