चिंचवड (Pclive7.com):- बनावट हार्पिक विक्रीप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सुमारे १ लाख ३४ हजार ४२० रुपयांच्या बनावट मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील कृष्णा हॉटेलजवळ, वाल्हेकरवाडी रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडे Reckitt Benckiser India Private Limited कंपनीच्या हार्पिक (Harpic) या उत्पादनाच्या नावाने बनावट माल विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत हिराराम गिरिधरलाल चौधरी (वय ४२, रा. चिंचवडेनगर), विष्णुकुमार खंगाराम चौधरी (वय ३३, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, चिंचवड) यांच्यासह गजेंद्र शेरसिंग जव्हेरी (रा. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी धरमवीर अमरनाथ धल्लोड (वय ४०, रा. शितलानगर, मामुर्डी, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी कंपनीच्या उत्पादनाची बनावट प्रत तयार करून विक्रीसाठी साठा ठेवला होता, असा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) तसेच कॉपीराइट कायदा १९५७ चे कलम ५१(ब), ६३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधे हे करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group