पिंपरी (Pclive7.com):- आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. आज दुपारी पुणे-नाशिक मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अनेक नागरिक या कोंडीत अडकले होते. यावेळी बहिनींना आपल्या भावाला वेळेवर राखी बांधता यावी यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे कार्यकर्त्यांचे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे मदत कार्य सुरू होते. हा सर्व प्रकार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना समजताच ते स्वत: कुठलाच विचार न करता रस्त्यावर उतरले. त्यांनी केलेल्या या मदत कार्यामुळे अनेकांना रक्षाबंधनाचा सण वेळेवर साजरा करता आला. सध्या सोशलमिडीया आणि भोसरी परिसरात महेश लांडगे यांनी केलेल्या या मदत कार्याचे कौतुक होत आहे.
अन् पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवायला आमदार महेश लांडगे रस्त्यावर उतरले






















Join Our Whatsapp Group