न पुण्याकडे जाणारा मार्ग येत्या गुरुवारी (ता. ६) दुपारी बारा ते दोनपर्यंत बंद राहणार आहे. खालापूर टोलनाक्यापूर्वी ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास बंद राहणार आहे, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
यासाठी साधारण दोन तासाचा अवधी लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. या कालावधीत अवजड मालवाहतूक वाहनांना सोडण्यात येणार नाही. त्यामुळे अवजड वाहनचालकांनी आधीच नियोजन करावे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे.