पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराच्या वृत्तपत्रसृष्टीचे जनक जेष्ठ पत्रकार कै.भा.वि. कांबळे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेत अभिवादन करण्यात आले. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी कै.भा.वि.कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जेष्ठ पत्रकार कै.भा.वि. कांबळे पत्रकार कक्षात त्यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार नगरसेवक शितल शिंदे, पत्रकार संघाचे बापू गोरे, दै.पवना समाचारचे संपादक अरूण कांबळे, तसेच पत्रकार उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group