पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या क्रीडा अध्यक्षपदी कासारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक रघुनाथ महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा शहराध्यक्ष रवी लांडगे यांच्या हस्ते विवेक महाजन यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजप प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक माऊली थोरात, नगरसेवक बाबु नायर, उमा खापरे, राजेश पिल्ले, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.