पिंपरी (Pclive7.com):- राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर गेलेल्या विलास लांडे यांचे सध्या चालले आहे काय हा प्रश्न पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्यांनाच पडलाय. पण आता त्याचे उत्तर सर्वांनाच मिळण्याची शक्यता आहे. खुद्द थोरल्या साहेबांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच विलास लांडे यांचा हात घट्ट पकडत माझे तुझ्याकडे लक्ष आहे असे सूचित तर केले नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे विलास लांडे यांचा आणि शरद पवार यांचा फोटो…!
दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्यभरातले नेते, कार्यकर्ते बारामतीला जातात. विलास लांडे ही बारामतीला पवारांना भेटण्यासाठी गेले होते. तेंव्हा पवार साहेबांनी विलास लांडे यांचा हात असा घट्ट पकडल्याचे दिसत आहे. विलास माझे तुझ्याकडे लक्ष आहे असे हा फोटो सूचित करतायेत…
भाजपची जोरदार हवा असतानाही विलास लांडे यांनी राष्ट्रवादीची पर्यायाने शरद पवार यांची साथ सोडली नाही. सध्या शहरात राष्ट्रवादी आणि विलास लांडे हे दोघेही राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर आहेत. पण खुद्द शरद पवार यांनीच जर मनावर घेतले तर विलास लांडे आणि राष्ट्रवादी फ्रंटफुटवर यायला वेळ लागणार नाही असे जाणाकारांचे मत आहे. पण तूर्तास हा फोटो पाहून सगळ्यांच्या मनात हा प्रश्न नक्की आहे की विलास लांडे यांच्या बाबतीत मोठ्या साहेबांच्या मनात चाललयं तरी काय….?