पिंपरी (Pclive7.com):- पवना नदीच्या काठी सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली. मावळ तालुक्यातील ओझर्डे गावात शिरगाव पोलिसांनी रविवारी (दि.५) दुपारी बाराच्या सुमारास छापा मारून ही कारवाई केली. त्यात पोलिसांनी दोन लाख १३ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला.
शरणशक्ती सुरंग राठोड (३५, रा. ओझर्डे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार रामेश्वर जाधवर यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड याने ओझर्डे गावात पवना नदीच्या काठावर झुडपाच्या आडोशाला दारूभट्टी लावली. त्याने दारू तयार करण्यासाठी गूळ मिश्रित रसायन साठवून ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यात दोन लाख १३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.