पिंपरी (Pclive7.com):- भोसरी एमआयडीसी परिसरातील एका लघुउद्योग कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीतील विविध यंत्रसामग्री आणि पार्ट्सचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज (दि.२७) दुपारी सव्वा बारा वाजण्याची सुमारास MIDC परिसरातील एफ-2 ब्लॉक, प्लॉट क्रमांक 5/2/3 येथे असलेल्या डि-टेक ऑटोमेशन, कॉलिटी कन्व्हर्स आणि दर्शन केमिकल या कंपन्यांमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्लायवूड, महत्त्वाची कागदपत्रे, कॉम्प्युटर तसेच विविध यंत्रसामग्री जळून नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दरम्यान, आग लागलेली संबंधित कंपनी अनधिकृत असल्याची माहितीही या घटनेनंतर समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित विभागाकडून पुढील चौकशी सुरू असून, नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.



















Join Our Whatsapp Group