
पिंपरी (Pclive7.com):: रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. संबंधित भागात नवीन जलवाहिनीला जुन्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने नागरिकांना आता नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळणार आहे.

या समस्येबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. त्याची तात्काळ दखल घेत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत ही समस्या अल्पावधीत मार्गी लागली.

काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ऋषिकेश गेंगजे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण प्राधान्याने करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली आहे.
Tags: Babasaheb Tribhuwan





















Join Our Whatsapp Group