
पिंपरी (Pclive7.com):- यमुनानगर परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून, अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित यमुनानगर जलतरण तलाव अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उद्घाटनाचा सोहळा उत्साहात पार पडला. हा जलतरण तलाव सुरू करण्यासाठी शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

जलतरण तलावाच्या उद्घाटन समारंभाला नगरसेविका सुलभा उबाळे तसेच नगरसेवक नगरसेवक बापू घोलप, उत्तम केंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. नवीन सुरू झालेल्या या जलतरण तलावात नागरिकांना पोहण्यासोबतच व्यायामाची सुविधा उपलब्ध होणार असून कुटुंबीयांसोबत विरंगुळा घालवण्यासाठीही हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

प्रशासनाकडून तलावाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी अनुभव मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, शहरातील नागरिकांसाठी हा जलतरण तलाव विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात थंडावा देणारे आदर्श मनोरंजन स्थळ ठरेल, अशी माहिती नगरसेविका सुलभा उबाळे यांनी दिली.




















Join Our Whatsapp Group