
पिंपरी (Pclive7.com):- पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या विषयामध्ये पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे अधिक लक्ष घालणार आहेत. त्यासाठी त्या उद्या, शुक्रवारी (दि.१०) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यामध्ये पंकजाताई दुपारी एक वाजता त्या तळवडे येथील ‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ आणि इंद्रायणी नदीच्या सद्यःस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी १:३० वाजता रावेत येथील पंपिंग स्टेशनला भेट देऊन पवना नदीच्या प्रदूषणाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात त्या नदी प्रदूषणावरील उपाययोजनांबाबत महत्त्वाची बैठक घेतील. शनिवारी (दि. ११) पंकजा मुंडे या पुण्यातील मुळा-मुठा नदी प्रदूषणाची पाहणी करतील.

पवना व इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण पाहता पंकजा मुंडे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. नदी प्रदूषणावर ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी शहरवासियांना अपेक्षा आहे.




















Join Our Whatsapp Group