
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागात नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिक भेटीसाठी येत असताना संबंधित कर्मचारी झोपलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे माहिती न मिळाल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या कामासाठी असलेल्या कार्यालयात कर्मचारीच निष्क्रिय असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आयुक्तांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group