
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत आवेदनपत्र सादर करता येणार आहे.

ही परीक्षा ७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध व्हावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group