
पिंपरी (Pclive7.com):- नवीन रिक्षा देण्याचे आमिष दाखवून बनावट पावती देत एका चालकाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना वाकड येथील रिदम ऑटो, विनोदेवस्ती येथे १० फेब्रुवारी २०२५ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान घडली.

विकास अभिमन्यू वाघमारे (४३, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किशोर ऊर्फ सचिन सुधाकर बागडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला नवीन अल्टो रिक्षा देण्याचे सांगून बुकिंगसाठी ५ हजार आणि रोख १ लाख रुपये घेतले. त्यानंतर कोणतीही कागदपत्रे, विमा किंवा पासिंग नसलेली रिक्षा देऊन फसवणूक केली. फिर्यादीने आक्षेप घेतल्यानंतर रिक्षा परत घेतली. मात्र, पैसे परत न देता विश्वासघात केला.




















Join Our Whatsapp Group