पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे यांच्या रणरागिणींनी महायुतीच्या विजयासाठी कसली कंबर आहे. भोसरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या विजयासाठी सेनेच्या रणरागिणी मैदानात उतरल्या आहेत. लांडगे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे ह्यांच्या नेतृत्वखाली महिला आघाडीचा स्नेह मेळावा आज यमुनानगर येथे पार पडला.
महायुतीचे उमदेवार आमदार महेश लांडगे ह्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या मेळाव्याला महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे, वेदश्री काळे, शशीकला उभे, जनाबाई गोरे, गौरी घंटे, रुपाली आल्हाट, नंदा दातकर, राजश्री पाटील, निर्मला पाटील, पुष्पा मुतंडीकर, मनीषा परांडे, भारती चकवे, कोमल साळुंखे, विजया जाधव, दीपा गुरव, प्रतीक्षा लोयरे, श्रीदेवी लामझने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. युवतीअधिकारी प्रतीक्षा घुले ह्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे ह्यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group