पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ वल्लभनगर, खराळवाडी, कामगारनगर व गांधीनगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली. काल सकाळी अकरा वाजता खराळवाडी येथील खराळआई मंदिरापासून पदयात्रेला सुरूवात झाली.
रिपब्लिकन पक्षाचे लक्ष्मण गायकवाड, विकास कांबळे, भारत पुंडे, रघुनाथ सोनटक्के, दिनेश म्हस्के, संभा वाघमारे, बंडू वाघमारे, शरद साबळे तसेच सेना-भाजपचेकार्यकर्ते मोठया संख्येने उमेदवार ॲड. चाबुकस्वार यांच्यासमवेत होते. संपूर्ण खराळवाडी, गीता माता मंदिर परिसर, कामगारनगर, व गांधीनगर भागातून पदयात्रा काढण्यात आली.
त्यानंतर संत तुकारामनगर परिसरात नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक यशवंत भोसले, जितेंद्र ननावरे तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्त उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group