पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदान केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित होते.
आज सोमवार दि.२१ रोजी राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे.पावसाचे वातावरण असल्यामुळे शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. चिंचवड विधानसभेचे भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सकाळी ७ वाजताच पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





















Join Our Whatsapp Group