पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भोसरीतील लांडेवाडी येथील महापालिकेच्या शाळेत त्यांनी सकाळीच मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी भोसरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपला हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यात आज सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे आणि महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्यात भोसरीत थेट लढत होत आहे. आठवडाभरात आरोप- प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली होती. आज सकाळीच महेश लांडगे यांनी मतदान केले असून मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाच वर्षात केलेले काम आणि महायुतीचा झंझावात तसेच कार्यकर्त्यांच्या जोरावर लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजयी होऊ असा विश्वास त्यांनी यावळीे व्यक्त केला.





















Join Our Whatsapp Group