तळेगाव (Pclive7.com):- मावळात राष्ट्रवादीचे सुनील शेळके 93 हजार 612 मतांनी विजयी झाले आहेत. मावळची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी प्रतिष्ठेची झाली होती. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले सुनील शेळके यांनी भाजपचे बाळा भेगडे यांना कडवे आव्हान दिले होते.
आज सकाळी मतमोजणीच्या प्रथम फेरीतूनच दोघांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. मात्र, नंतरच्या काही फे-यांमध्ये सुनील शेळके यांनी मोठी आघाडी घेतली. नंतरच्या फे-यांमध्ये सुनील शेळके यांनी आघाडी घेत अखेर 93 हजार 612 मतांनी विजय नोंदवला.