बालेवाडी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे मतमोजणीला सकाळी ८ वाजता बालेवाडी येथे सुरुवात झाली अाहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत १७ व्या फेरीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप ३०,७३२ मतांनी आघाडीवर आहेत. चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप विरुद्ध सर्व पक्षीय पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात थेट लढत आहे.
सतरावी फेरी
लक्ष्मण जगताप (भाजपा) – १,१७,२८३
राहुल कलाटे (अपक्ष) – ८६,५५१