पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पिंपरीतील फुल मार्केट येथे ‘घबाडषष्टी’ हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी व कामगार यांना वर्षभराचे थकबाकी देवून व्यवहार सूरळीत करण्यात आला. कामगारांना बोनस वाटप तसेच नवीन कपडे देण्यात आले.
‘घबाडषष्टी’ हा अगळावेगळा उत्सव फुल विक्रेते आनंदाने साजरा करतात. आपल्या दुकानाची सजावट व फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात येते. दुकानातील कामगारांसोबत व शेतकऱ्यांसोबत हा सण साजरा करण्यात येतो. ही माहिती फुलांचे होलसेल व्यापारी मातोश्रीे सप्तश्रृंगी पुष्प भांडारचे मालक गणेश आहेर यांनी माहिती दिली.
यावेळी सर्व फुलांचे व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. मीनाताई आहेर, राजू मोरे, दत्ताञय फुले, बाबा रासकर, अजित तापकिर, दत्ता ठाकर, शिवाजी सस्ते, बाबा तापकिर, शाम मांडगे, विकास जाधव, प्रणित बडवे, अश्विनी जाधव, आनंता फुले, संजय बोडके, संतोष कदम, सर्व फुल विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.