पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील दवाखान्यातील कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी पिंपरी युवासेनेने केली आहे.
दवाखान्यातील कर्मचारी नागरिकांशी मोठ्या आवाजात बोलतात. सतत फोनमध्ये खेळत बसलेले असतात. झोपलेले असताता अशा तक्रारी फुगेवाडी-कासारवाडी-दापोडीमधील नागरिकांनी केल्या आहेत. त्या कामचुकार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करावी. येत्या १५ दिवसात कारवाई करण्यात यावी. अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याबाबत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अलवी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, शाखाप्रमुख प्रमोद शिंदे, नंदू कांबळे, संजय निंगडोळे, विकास गायकवाड, शैलेश हाके उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group