पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर तुषार हिंगे व नगरसदस्या सुमनताई पवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. निगडी चौकात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्या सुमन पवळे, शारदा सोनवणे, माजी नगरसदस्या उमा खापरे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.