पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील म्हाळुंगे येथील खराबवाडी येथे असणारे अॅक्सिस बँकेच्या एटीएमचे मशीन चोरट्यांनी पळवून नेले आहे. यामध्ये किती रक्कम आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि पळ काढल्याचा प्रकार सोर येत आहे. हा प्रकार रविवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला. मात्र वारंवार होणाऱ्या एटीएम चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चाकण खराबवाडी येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास स्कार्पिओ गाडीतून चोरटे आले. दोरीच्या सहाय्याने मशीन काढले आणि ते मशीन स्कार्पिओ गाडीत टाकून पळ काढला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग केला. मात्र एका ठिकाणी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांनी पळ काढला. याप्रकरणाचा स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा शोध घेत आहेत.






















Join Our Whatsapp Group