नवी दिल्ली (Pclive7.com):- कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपुर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केला होता. तेव्हापासुन देशात लॉकडाऊन सुरू असून सध्या त्याचा तिसरा टप्पा चालू आहे. दरम्यान, 17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्यानंतर पुढं काय करायच याबाबत सध्या केंद्र सरकार योजना आखत आहे. त्याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (सोमवार) दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगव्दारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार असून त्यामध्ये पुढच्या रणनीतीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
उद्या (सोमवार) दुपारी 3 वाजता होणार्या या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, चीफ सेक्रेटरी, होम सेक्रेटरी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक सहभागी होणार आहेत. 17 मे रोजी लॉकडाऊन संपतो. त्यानंतर सरकार काय भुमिका घेईल म्हणजेच लॉकडाऊन वाढेल की काय याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेऊ शकतात.























Join Our Whatsapp Group