पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिवशाही प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि गरजू रुग्णांना उपचारांची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे शिबिर उद्या शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पिंपरीगाव येथील हनुमान मंदिर, काळभैरवनाथ चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉ. मयूरी सुळवेवार-गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणीसोबतच अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा, अल्पदरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. डोळ्यांच्या समस्या वेळेत ओळखून उपचार मिळावेत, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमासाठी शिवशाही प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड शहरचे अध्यक्ष अथर्व सुनिल तावरे, संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव तसेच सचिव तेजस महेंद्र राऊत, उपाध्यक्ष सिद्धार्थ अनिल तावरे, कार्याध्यक्ष ऋषी शैलेश शिरसाट, संघटक तनय विलास कुदळे आणि सरचिटणीस ओम विशाल गोधडे यांचे विशेष योगदान लाभले आहे.

या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group