पिंपरी (Pclive7.com):- ना ढोल-ताशांचा दणदणाट…ना आसमंत दुमदुमून टाकणारा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष…ना आकर्षक विसर्जन रथ… ना मिरवणूक… गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेशभक्तांनी अतिशय साध्या पद्धतीने परंतु जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास, विसर्जन घाटावर जाऊन विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली होती. यामुळे अनेक नागरिकांनी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य दिले आणि घरातच तसेच गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात मूर्तींचे विसर्जन केले. तर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनंतचतुदर्शीला सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या होत्या.
त्यापैकी २५ हजार मूर्ती गेल्या दहा दिवसांमध्ये संकलित करण्यात आल्या तर अनंतचतुदर्शीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३० हजार मूर्ती संकलित करण्यात आल्या. या मूर्तींचे संस्कार प्रतिष्ठान आणि महापालिकेच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले.























Join Our Whatsapp Group