पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा शुक्रवारी (१ मे) सकाळी ७:०० वाजता पार पडला.

याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासह डॉ. अनुश्री चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. दक्षता विभागाचे पोलीस निरीक्षक पवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नितीन भोंगळे यांच्या पथकाने आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘पीएमआरडीए’मधील महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात आकर्षक रांगोळी रेखाटली होती. या सोहळ्याला प्रशासकीय विभागाच्या सहआयुक्त रुपाली आवले-डंबे, जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी,

मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी, अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील, अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेश माशेरे, तहसीलदार आशा होळकर, अधीक्षक भूमी अभिलेख आशा जाधव आणि अग्निशमन अधिकारी विजय महाजन यांच्यासह ‘पीएमआरडीए’च्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यगीताने या सोहळ्याची सांगता झाली.





















Join Our Whatsapp Group