पिंपरी (Pclive7.com):- भारतरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने प्रशासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने शिवसेना जनसंपर्क कार्यालय पिंपरी येथे साजरी करण्यात आली.
यावेळी मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष राजू आवळे, शिवसेना शाखाप्रमूख दत्ता गिरी, विभाग प्रमूख गोरख पाटील, राहूल कद, सागर तायडे, रविकिरण घटकार, बाळासाहेब गायकवाड, मारुती म्हस्के उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group