पिंपरी (Pclive7.com):- परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त पिंपळेगुरव मधील संघर्ष प्रतिष्ठानतर्फे ममता अंध-अनाथ कल्याण केंद्रास संविधानाची प्रतिमा, डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा भेट व अन्नदानही करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने सर्व सरकारी नियमांचे पालन करून भिमजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे गुरव मधील संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी प्रतिष्ठानचे आकाश गायकवाड, राहुल शिंदे, अभि शिंदे, शुभम शिंदे, शुभम गायकवाड, सौरभ बनसोडे, किरण चाबुकस्वार, साहील शिंदे, गौरव शिंदे, सत्यम गायकवाड, हिमांशु जगताप, शुभम पिंपळे, कुणाल जाधव, सुशिल गायकवाड, राहुल साठे, सिद्धार्थ पंचमुख आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group