पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथील प्लेटमास्टर्स कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात कर्मचाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
उद्योजक सचिन बापतीवाले यांच्या स्मरणार्थ या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ९५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या शिबीराचे उदघाटन प्लेटमास्टर्स कंपनीचे संचालक श्रीनिवास राठी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्लेटमास्टर्सचे संचालक सूर्यकांत राठी, दिलीप राठी, प्रकल्प प्रमुख संदीप जाधव, मनुष्यबळविकास विभाग प्रमुख अर्चना वाशीकर आदी उपस्थित होते.
श्रीनिवास राठी म्हणाले कि, कोरोनाच्या महामारीत वाढत्या रुग्नांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण रक्तदान केले पाहिजेत.
सह्याद्री ब्लड बॅंकेचे डॉ.अविनाश वैद्य, शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड अशा पातृडकर, युवराज वाघ यांचे या शिबीरास विशेष सहकार्य लाभले.
























Join Our Whatsapp Group