पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गावातील बाबुराव नरे व शर्मिला नरे यांची मुलगी श्रुती बाबुराव नरे (वय १७ वर्षे) हिचे मंगळवार दि.१७ ऑगस्ट रोजी पिंपरीतील डाॅ. डी.वाय. पाटील रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
अचानक डोक्यात तीव्र स्वरूपाची डोकेदुखी झाल्याने ती चक्कर येऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तात्काळ डी.वाय. पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने ती कोमात गेली. डॉक्टरांनी तिच्या डोक्यात मेंदूतील रक्तस्राव खुप मोठ्या प्रमाणावर झाल्याने तिचा ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले. तिचे बाकीचे सर्व अवयव पूर्णपणे कार्यरत होते. उपचारा दरम्यान तिचे दुर्दैवाने निधन झाले.
यानंतर तिच्या आई वडीलांनी जड अंतःकरणांनी श्रुतीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज अनेक श्रुती आपल्यामध्ये दिसणार आहेत. त्यांच्या या निर्णयाला सर्व स्तरातून पाठिंबा व कौतुक होत आहे.























Join Our Whatsapp Group