पिंपरी (Pclive7.com):- गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात शाळा तसेच बालवाड्या सुध्दा बंद होत्या. त्यामुळे आता जे विद्यार्थी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांचा बौद्धिक विकास, भाषिक विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास अशा विविध प्रकारचा विकास कसा करावा यासाठी शासन नियमानुसार ‘शाळा पूर्व तयारी मेळावा’ आज दि.२६ एप्रिल २०२२ पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपळे सौदागर शाळा क्र. ५१ या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इयत्ता १ ली ला प्रवेशित बालकांचा माता पालकांसह एक दिवसीय शाळा प्रवेश मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत विविध प्रकारचे सात स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारच्या खेळणी ठेवण्यात आल्या होत्या त्यातून बालकांना शिक्षणाची ओढ निर्माण करता येईल याचे प्रात्यक्षिक शिक्षकांनी पालकांना समजावून सांगितले.

यावेळी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल ऊर्फ नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या पूर्व तयारीची पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा जोशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group