पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात एक दिवसाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पाठवले आहे. ही घटना सोमवारी (दि.२२) दुपारी अडीचच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.

सांगावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे रामकृष्ण मोरे मंगल कार्यालयाजवळील मैदानाच्या शेजारी एक दुकान आहे. त्या दुकानाच्या मागील बाजूला सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास स्थानिक नागरिकांना लहान बाळ आढळले.
एका नागरिकाने ११२ या हेल्पलाइनवर याबाबत माहिती दिली. त्यानंतर सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भक ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. चिमुकलीला सोडून दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. याबाबत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
























Join Our Whatsapp Group