पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा कार्यभार ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मान्यतेने सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर कार्यरत असलेले किरण बाळमुकुंद गावडे हे नियत वयोमानानुसार दि.३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे पद रिक्त झाले. हा विभाग महत्वाचा असल्याने प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अग्निशमन विभागाचा अतिरिक्त कार्यभार ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज ४ नोव्हेंबर पासून सुरु झाली असून पुढील आदेश होई पर्यंत थोरात या विभागाचे कामकाज पाहणार आहेत.

























Join Our Whatsapp Group