पिंपरी (Pclive7.com):- भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसकडून मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबाबसहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ कॉंग्रेसच्या मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ झाला. कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, महिला शहराध्यक्ष सायली नढे, माजी नगरसेवक सदगुरु कदम, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, एनएसयूआय शहराध्यक्ष वसिम इनामदार, मागासवर्गीय शहराध्यक्ष विजय ओव्हाळ, सेवादल शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, निर्मला खैरे, डॉ. मनीषा गरुड, प्रियंका कदम, आशा भोसले, बाबा बनसोडे, प्रा.किरण खोजेकर, मिलिंद फडतरे, गौतम ओव्हाळ, जेव्हीयर ॲन्थोनी, आण्णा कसबे, हरिष डोळस, राहुल ओव्हाळ, उमेश बनसोडे, जुबेर खान, सचिन सोनटक्के, बसवराज शेट्टी, सौरभ शिंदे, किरण नढे, आकाश शिंदे, स्वप्नील बनसोडे, संदीप शिंदे, शंकर ढोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी यांची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे. देशातील विषमतेचे वातावरण, धर्म आणि जातीमधील तेढ विरोधात ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची शहरात जनजागृती व्हावी या करिता एलईडी (LED) स्क्रीन असलेल्या गाड्यांचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या एलईडी (LED) स्क्रीन असलेल्या गाड्यांवर् यात्रेचे प्रक्षेपण दाखविण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.