पिंपरी (Pclive7.com):- निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि त्यावर पडलेले शेकडो खड्डे अद्यापही पिंपरी चिंचवड महापालिकेने बुजवलेले नाहीत. ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट युतीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना धोकादायक खड्डे चुकवत जगावे लागत आहे. आम आदमी पार्टीच्या पिंपरी विधानसभा कार्यकारी अध्यक्ष ब्रम्हानंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड स्टेशन येथे खड्ड्याभोवती मातीच्या पणत्या लावून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवडच्या वतीने खालील मागण्या केल्या आहेत.
१. मनपा आयुक्तांनी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात खड्डे सर्वेक्षण योजना राबवून खड्डे मोजावेत आणि संबंधित ठेकेदार, अधिकारी यांना रिजेक्शन चार्जेस लावून मोफत दुरुस्ती करून घ्यावी.
२. भविष्याच्या दृष्टीने शहरातील रस्त्यांचे हिस्ट्री कार्ड तयार करण्यात यावे.
या आंदोलनात चेतन बेंद्रे, ब्रह्मानंद जाधव, यशवंत कांबळे, गोविंद माळी, प्रविण शिंदे, सुंदर ओव्हाळ, चंद्रमनी जावळे, मीना जावळे, अजय सिंह, शिवाजी कदम, सोमनाथ बनसोडे, वाजीद शेख, रोहित सरनोबत, कमळ गवई, भागूबाई खाडे, मालिनी पवार, आजीनाथ सकट, राजेश सापरे, सुरेश भिसे, आशुतोष शेळके, संदीप राठोड, आकाश इंगळे, संतोषी नायर, सचिन पवार हे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.






















Join Our Whatsapp Group