पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवडचे पाचवे पोलीस आयुक्त म्हणून अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांनी आज बुधवारी (दि.१४) सायंकाळी अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला. अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबत मंगळवारी रात्री आदेश दिले होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘दिशा’ उपक्रम राबविला. तसेच बेसिक पोलिसिंगवर भर दिला. त्यात कोम्बिंग ऑपरेशनसह गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला. तसेच शिंदे यांनी स्वतः लॉटरी सेंटरवर कारवाई केली. त्यानंतर पोलीस निरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करून नियंत्रण कक्ष येथे संलग्न केले.