पिंपरी (Pclive7.com):- वाहनाच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या दोघांनी मिळून साडेसहा लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार १९ ऑगस्ट २०२२ ते १६ जून २०२३ या कालावधीत गारवे ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वाकड शाखेत घडला.

गौरेश गजानन सुगते (२५, रा. नवी सांगवी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण मच्छिद्र काळे (रा. काळेवाडी) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुगते हे गारवे ऑटोमोबाईल्समध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. आरोपी प्रवीण हा सेल्समन तर आरोपी महिला रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत होती. दरम्यान, आरोपींनी आपसात संगनमत करून शोरूममधून बजाज कंपनीच्या विविध मॉडेलच्या दुचाकींची विक्री केली. दुचाकींचे पेमेंट आरोपींनी वैयक्तिक फोन पे आणि बँक खात्यावर स्वीकारले. विक्री केलेल्या गाड्यांचे कागदपत्रे न देता बनावट गेट पास, शोरूम बँक पावत्या बनवून ग्राहकांची फसवणूक केली. अशा प्रकारे आरोपींनी ग्राहकांकडून एकूण सहा लाख ६६ हजार ३३ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

























Join Our Whatsapp Group