पिंपरी (Pclive7.com : संदेश पुजारी):- पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये गाड्या फोडण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अवघ्या काही तासातच सांगवी पोलिसांनी गाड्या फोडणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. या घटनेची पहिली बातमी Pclive7.com (पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज) ने प्रसिद्ध केली होती. दहशत पसरवणाऱ्या या गुंडांची पिंपळे सौदागर मधून सांगवी पोलिसांनी दिंड काढली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (दि.०६) शहरात होते. त्याच रात्री ही तोडफोड झाल्याने पोलीस प्रचंड दबावाखाली होते. मात्र सीसीटीव्ही आणि तांत्रिक अभ्यास करून सांगवी पोलिसांनी काही तासांच्या आतच आरोपींना पकडत त्यांची परिसरात धिंड काढली आहे.
पिंपळे सौदागर मधील काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डन चौक या रस्त्यावर रात्री पार्क केलेल्या नऊ ते दहा वाहनांची रात्री तोडफोड झाली होती. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तरुणांनी मोठ मोठी दगडे फेकत गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या.
या घटनेमुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. Pclive7.com ने सकाळीच सर्वात पहिल्यांदा हे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.