पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील अशुद्ध जलउपसा केंद्र, रावेत येथे विद्युत विषयक अत्यावश्यक ए.बी.टी मीटर बसविण्यात येणार आहे.
या कारणास्तव रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
सदर कालावधीत रावेत येथील जलउपसा बंद राहणार असल्याने पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे.
तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि काटकसरीने पाणी वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.