पिंपरी (Pclive7.com):- पै.बाळासाहेब रामचंद्र लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहर निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी स्पर्धा (माती आणि गादी विभाग) सोमवार दि.१३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता भोसरी येथील पै. मारुती रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे असून संयोजक पै. नितिन बाळासाहेब लांडगे, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन भवानी तालीम यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेबद्दल माहिती देताना संयोजक पै. नितीन बाळासाहेब लांडगे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने धाराशिव येथे होत असलेली ६५ वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अस्थायी समिती निरीक्षक महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड चाचणी निवड कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र केसरी २०२३-२४ साठी पिंपरी चिंचवड शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
पै. बाळासाहेब रामचंद्र लांडगे (वस्ताद) ऑम्युनिशन फैक्टरी) यांच्या ६९ वा वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि.१३) रोजी (वजन गट 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 86 ते 125 महाराष्ट्र केसरी) माती आणि गादी विभाग मध्ये या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
भोसरी येथील पै. मारुती रावजी लांडगे अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन येथे या स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या स्पर्धेचे आयोजक असून संयोजक पै. नितिन बाळासाहेब लांडगे, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन भवानी तालीम हे असणार आहेत.